लोधिवली ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण; खालापूर पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांचा ठिय्या

खालापूर : प्रतिनिधी

खालापूरातील ग्रुप ग्रामपंचायतमधील विकास कामे व अनियमिततेबाबत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करून ग्रामस्थ मारुती तवले यांनी पंचायत समिती खालापूर यांच्या कार्यालयासमोर गुरुवारी

(दि. 12) उपोषणाला सुरुवात केल्याने लवकरच भ्रष्टाचार बाहेर येईल अशी चर्चा सुरु आहे.

ग्रामपंचायतीत विकासकामात भ्रष्टाचार झाला असून त्याच्या पारदर्शक चौकशीसाठी ग्रामस्थ मारुती तवले व ग्रामस्थांनी पंचायत समिती खालापूर कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ग्रुप ग्रामपंचायत चौकचे विभाजन झाल्यावर ग्रुप ग्रामपंचायत लोधिवली अस्तित्वात आली. विकासकामे करताना एलईडी दिवे, सदस्य यांनी पेव्हर ब्लॉक आपल्या जागेत बसविणे, माती भराव, स्वतःची जागा असून भाड्याने कार्यालय घेणे, त्याच त्याच कामाची पुन्हा निविदा काढणे, घंटा गाडी दुरुस्ती करणे, कर्मचारी यांच्या नावावर धनादेश काढणे असे अनेक आरोप आहेत, विशेष म्हणजे ही माहिती माहितीच्या अधिकाराचा वापर करून मिळवण्यात आली आहे. अशी विकास कामे करताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थ मारुती तवले यांनी करत चौकशीसाठी 18 नोव्हेंबर 2019  रोजी विभागीय आयुक्त ते गट विकास अधिकारी खालापूर यांच्याकडे तक्रार अर्ज देऊन चौकशीची मागणी केली. मात्र त्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही.

दरम्यान धनाजी भुईकोट व एकनाथ सांगळे यांनी अचानक या उपोषणमधून का माघार घेतली अशी जोरदार चर्चा उपोषण स्थळी सुरू आहे. दरम्यान सभापती वृषाली पाटील, उपसभापती विश्वनाथ पाटील, माजी सभापती कांचन पारंगे, गट विकास अधिकारी संजय भोये यांनी मारुती तवले यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील, आपले काही बरेवाईट झाले तर त्याला प्रशासन जबाबदार राहील, असे मारुती तवले यांनी सांगितले. भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाली पाहिजे, आपण भ्रष्टाचार विरोधात असल्याचे उपसभापती यांनी सांगून अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. या उपोषणाला मारुती तवले यांच्या पत्नी, अनेक महिला, ग्रामस्थ सहभागी आहेत.

चौकशीसाठी समिती नेमली आहे. चौकशीचा अहवाल अद्याप मिळाला नाही. चार वर्षांचा तपास आहे. त्यामुळे वेळ लागत आहे.– संजय भोये, वरिष्ठ गट विकास अधिकारी,  खालापूर पंचायत समिती

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply