Breaking News

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पनवेलमध्ये जंतूनाशकांची फवारणी

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेतर्फे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सूचनेनुसार मनपा हद्दीत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जंतूनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. एकूण आठ पथके फवारणीचे काम करीत आहेत.
सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने जंतूनाशकांची फवारणी करावी, अशी सूचना केली होती. त्याप्रमाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शुक्रवारी
(दि. 20) मिडलक्लास सोसायटी, पायोनियर सोसायटी, लाईन आळी, परदेशी आळी, कोळीवाडा, मच्छी मार्केट, कच्छी मोहल्ला, नूर मोहल्ला, कुंभार वाडा, मिरची गल्ली या भागात फवारणी करण्यात आली. याशिवाय पनवेल एसटी स्टॅण्डवर आणि बसगाड्यांमध्येही फवारणी केली गेली.
पनवेल महापालिकेचे आरोग्य अधिकारी शैलेश गायकवाड यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पनवेल महापालिकेच्या हद्दीतल सिडको प्रभागातील कामोठे, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल यासह सिडको हद्दीतील महापालिका क्षेत्र आणि महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायत हद्दीतही जंतूनाशकांची फवारणी करण्यात येणार आहे. 

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply