खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
दुचाकी घेण्यासाठी एक लाख रुपयाचा तगादा लावणार्या पतीच्या छळाला कंटाळून पूजा जयेंद्र जाधव (वय 22) हिने साडीद्वारे गळफास घेतल्याची हृद्ययद्रावक घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पूजाच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
कर्जत तालुक्यातील मुगपे हे माहेर असलेल्या पूजाचे 2018मध्ये खालापूर तालुक्यातील मिळगाव कातकरवाडी येथे राहणार्या जयेंद्रबरोबर लग्न झाले होते. जयेंद्र हा पूजाला दुचाकी घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्यासाठी वारंवार त्रास देत असे, परंतु माहेरची परिस्थिती बेताची असल्याने पूजा नवर्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत होती.
मागणी पूर्ण होत नाही हे पाहून जयेंद्रने पूजाला शारिरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरवात केली. हा त्रास असह्य झाल्याने पूजाने रविवारी (दि. 15) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास छताच्या पाईपला साडीच्या साय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच मयत पूजाच्या वडिलांनी जावई जयेंद्र जाधवविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार खोपोली पोलीस ठाण्यात पूजाचा पती जयेंद्रविरोधात भा. दं. वि. कलम 498, 306 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरिक्षक मुल्ला अधिक तपास करीत आहेत.
Check Also
महाराष्ट्रातूनही ५० लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार -किरीट सोमय्या
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयगाच्या वतीने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान राबविण्यात येत आहे. …
RamPrahar – The Panvel Daily Paper