पनवेल : रामप्रहर वृत्त
गुढीपाडव्याचा सण बुधवारी (दि. 24) पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा नागरिकांनी निरोगी आरोग्याची गुढी उभारल्याचे चित्र दिसून आले.
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षारंभ होतो. भारतीय संस्कृतीत चैत्र महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. केवळ धार्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिकच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही हा मास उत्साहवर्धक असतो, परंतु या वर्षी संपूर्ण जगावर कोरोना चे सावट आहे. त्यामुळे आपला देशही सध्या लॉकडाऊन आहे. या पार्श्वभूमीवर पाडव्यानिमित्त निघणार्या शोभायात्राही रद्द करण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी विधीवत पूजा-अर्चा करून व गुढी उभारून साधेपणाने गुढीपाडवा साजरा केला. सोशल मीडियावरही घरी राहून आरोग्याची काळजी घेत हा सण साजरा करण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper