नवी दिल्ली : देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात येणार असल्याच्या सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत, मात्र या चर्चा म्हणजे अफवा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढवण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी दिले आहे. केंद्राच्या या निर्णयाबाबत माहिती देताना राजीव गौबा म्हणाले, देशातील लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याच्या चर्चा ऐकून मला आश्चर्य वाटले. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे 21 दिवसांनंतरही लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत आता कॅबिनेट सचिवांनी लॉकडाऊन वाढवण्याचा सरकारचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper