Breaking News

नवीन पनवेलमधील रुग्णालय सील

मुलगी अमेरिकेतून आल्याचे न कळविता डॉक्टरने रुग्ण तपासल्याने मनपाची कारवाई

पनवेल : प्रतिनिधी
आपली मुलगी अमेरिकेतून आल्याचे महापालिकेला न कळविता रुग्णांची तपासणी सुरू ठेवल्याने नवीन पनवेल येथील डॉ. मोहिते यांचे साई बाल रुग्णालय सील करण्यात आले आहे. पनवेल महापालिकेने ही कारवाई केली.
लहान मुलांसाठी प्रख्यात असलेले डॉ. मोहिते यांचे नवीन पनवेल सेक्टर 19मधील अग्निशामक केंद्रासमोर साई बाल रुग्णालय आहे. त्यांची मुलगी स्वरा 16 मार्च रोजी अमेरिकेतून आली, मात्र ही माहिती त्यांनी महापालिकेपासून लपवून ठेवली, तसेच डॉ. मोहिते हे रुग्णालयात रुग्णही तपासत असल्याचे उघड झाले. त्यामुळे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी त्यांना नोटीस बजावून दवाखाना पुढील आदेश मिळेपर्यंत सील केला आहे.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply