Breaking News

खालापूर सीमेवर नाकाबंदी

खोपोली ः पाली-खोपोली रस्ता कोकणाचे प्रवेशद्वार आहे. मुंबई उपनगरातून अनेक प्रवासी येथून वाहतूक करीत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता दुचाकी, चारचाकी वाहनांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी देताच खालापूर तालुक्याची शेवटची हद्द असलेल्या गोंदाव फाटा येथे पोलिसांनी नाकाबंदी केली. सखोल चौकशी करूनच अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या वाहनांना परवानगी मिळत असून अनावश्यक वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस अनावश्यक फिरणार्‍या वाहनांना माघारी पाठवत असून वाहनचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यास कठोर कारवाई करीत असल्याची माहिती पाली पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई आर. डी. कांदे यांनी दिली आहे.

Check Also

करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!

मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …

Leave a Reply