Breaking News

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून  कोरोनाग्रस्तांसाठी 37 लाखांचा मदतनिधी

अलिबाग : प्रतिनिधी
प्रबोधनातून जनसेवा करणार्‍या डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 37 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा निधी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सहाय्यता निधीकरिता 16 लाख रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19करिता 16 लाख रुपये आणि जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीत पाच लाख रुपये असे एकूण 37 लाख रुपयांचे डिमांड ड्राफ्ट जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आले. या वेळी प्रतिष्ठानचे उमेश धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

Check Also

अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन्‌‍ बोलके राहा!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …

Leave a Reply