Breaking News

आज पुन्हा घडणार देशाच्या एकतेचे दर्शन

रात्री 9 वाजता अंधारात दिवे उजळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 5) रात्री 9 वाजता नऊ मिनिटे लाइट बंद करून दिवे, पणत्या, मेणबत्या, टॉर्च, लावण्याचे आवाहन केले आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा देशाच्या एकतेचे दर्शन घडणार आहे. यापूर्वी टाळ्या, थाळी वा वाद्य वाजवून अत्यावश्यक सेवा देणार्‍यांना प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
वेळोवेळी देशातील जनतेच्या सामूहिक शक्तीची भव्यता, दिव्यता आणि त्याचा अनुभव घेणे आवश्यक आहे. देश कोरोनाविरुद्ध इतकी मोठी लढाई लढत असताना आम्हाला जनता जनार्दनाचे विराट रूप, त्यांची अपार शक्ती याचा सतत साक्षात्कार करीत राहिले पाहिजे. यासाठी 5 एप्रिलला 130 कोटी जनतेच्या महाशक्तीचे जागरण करायचे आहे. या रात्री 9 वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व लाइट्स बंद करा. त्यानंतर घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीत या आणि मेणबत्ती, दिवा किंवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या नऊ मिनिटांच्या काळात कोणालाही बाहेर
जायचे नाही, कोणालाही एकत्र जमायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
नॅशनल ग्रीडवर परिणाम होणार नाही : बावनकुळे
नागपूर : नऊ मिनिटे लाइट बंद केल्यानंतर घरातील विजेची अन्य उपकरणे सुरूच राहणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय ग्रीडवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही असे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाइट बंद करून पणत्या, दिवे, टॉर्च, मेणबत्या लावण्याच्या केलेल्या आवाहनाला साद द्या, असे आवाहन राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्याचवेळी या संदर्भात विद्यमान ऊर्जामंत्र्यांनी दिशाभूल करू नये, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली आहे.

Check Also

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील अवकाळी पाऊस, …

Leave a Reply