
कडाव ः लॉकडाऊनच्या संकटात दिलासा देण्यासाठी कर्जतमधील सावेळे ग्रामपंचायत हद्दीत मोहन मानव सेवा सामाजिक संस्थेच्या वतीने गरजू लोकांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी मोहन मानव संस्थेचे अमित जैन, भाजप सावेळे जिल्हा परिषद अध्यक्ष अंकुश मुने, सावेळे ग्रामपंचायत सदस्य सुभाष गायकवाड, प्रज्ञेश खेडकर, कल्पेश पांचाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.