Breaking News

अनाथ, गरिबांना दिले स्वच्छतेचे धडे; खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन

पाली ः प्रतिनिधी

कोरोनाविरोधात डॉक्टरांप्रमाणेच पोलीसदेखील मौलिक भूमिका बजावत आहेत. लॉकडाऊन काळातील पोलिसांच्या दंडुक्याच्या व माणुसकीचे दर्शन घडविणार्‍या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशाच प्रकारे वडखळ पोलीस चौकीवर कार्यरत असलेले पोलीस सचिन खैरनार यांनी रस्त्यावरील अनाथ, गरीब, फिरस्ते आणि भिकार्‍यांना त्यांचे तोंड, हात, पाय धुवून स्वखर्चाने आणलेले मास्क स्वतःच्या हाताने घालून खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडविले. सचिन खैरनार हे अलिबाग पोलीस मुख्यालयात पैरवी कर्मचारी म्हणून काम करीत आहेत.  वडखळ विभागात रस्त्यावर फिरणारे अनाथ, फिरस्ते व भिकार्‍यांना कोरोनाबाबत कसलेही ज्ञान नाही. त्यांना घाणेरडे व समाजापासून दूर गेलेले म्हणून तिरस्काराची वागणूक मिळते. अशा फिरस्त्यांसाठी सचिन खैरनार देवदूत म्हणून धावून आले. त्यांचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी सचिन खैरनार यांनी स्वतःच्या पैशांतून खरेदी केलेले मास्क या अनाथ, भिकारी व फिरस्त्यांच्या तोंडाला लावले. पोलीस म्हणून केवळ आपली ड्युटी करणाराच नव्हे, तर समाजाचा देणेकरी म्हणून माणुसकी जपणाराही पोलीसच असतो हेच आपल्या कृतीतून सचिन खैरनार यांनी दाखवून दिले आहे. याबाबत पोलीस विभागासह सामाजिक संघटना व सर्वसामान्यांकडून खैरनार यांचे कौतुक होत आहे.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply