Breaking News

प्रभाग निर्जंतुकीकरणासाठी खोपोलीत औषध फवारणी

खोपोलीत औषध फवारणीखोपोली ः खोपोलीतील प्रभाग क्रमांक 5चे नगरसेवक समीर मसूरकर व केविना गायकवाड यांनी संयुक्तपणे संपूर्ण प्रभाग निर्जंतुकीकरण मोहीम राबवली. एका आठवड्यात प्रभागातील सर्व व्यापारी, रहिवासी संकुले व गल्लीबोळात औषध फवारणी करून स्वच्छता करण्यात आली. ही मोहीम नगरसेवकांनी व्यक्तिगत खर्चातून राबविली. यासाठी नगर पालिका मुख्याधिकारी गणेश शेटे तसेच स्वच्छता व आरोग्य विभागाचे मार्गदर्शन घेण्यात आले. आठवडाभर समीर मसूरकर, विशाल गायकवाड व मित्र मंडळाकडून मेहनत घेण्यात आली.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी ‘रयत’तर्फे हृद्य सत्कार

संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार गौरव सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …

Leave a Reply