Breaking News

कोरोनाविरोधात प्राथमिक आरोग्य केंद्र सतर्क; औषधसाठा सज्ज

रेवदंडा ः प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यात रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्राची कोरोनाच्या संकटकाळात सतर्क सेवा सुरू असून रुग्णसेवेसह कोरोनाविषयक सर्वेक्षण, जनजागृती व आरोग्यसेवा यांचे मार्गदर्शन दिले जात आहे.

रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात वावे, बामणगाव, खानाव, आग्राव, चिंचोटी, रामराज व नागाव हे सात उपकेंद्र आणि 16 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. डॉ. विजय वाघमोडे व डॉ. सोनिया जाधव हे दोन वैद्यकीय अधिकारी सेवाकाल देत असून एकूण 13 आरोग्यसेविका, पाच आरोग्यसेवक कार्यरत आहेत. विभागात एकूण 94 अंगणवाड्या असून 58 आशा वर्कर कार्यरत आहेत. रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे एक रुग्णवाहिका असून औषधांचा पूर्ण साठा सज्ज ठेवण्यात आला आहे.

उपकेंद्रातील सर्व कर्मचारी प्रत्येक गावामध्ये जाऊन कोरोनाविषयी

सर्वेक्षण करून कोरोनाची माहिती लोकांना देतात. शिवाय हात स्वच्छ ठेवणे, तोंडावर रूमाल, मास्क बांधणे, घरातून बाहेर पडू नये, घरातच राहणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता राखणे आदी आरोग्यसेवेची जनजागृती करीत आहेत. प्रत्येक गावात कोरोना नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत सर्व गावे व वाड्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक औषध फवारणी केली जात आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply