Breaking News

श्री वासुदेव सेवा मंडळाची घरपोच अन्नसेवा

खोपोली ः प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्यातही खोपोलीतील टेंबे स्वामी मठ संचलित श्री वासुदेव सेवा मंडळाकडून गरजूंना अन्नदान सेवा सुरू आहे. पहिल्या टप्प्यातही मंडळाच्या माध्यमातून दररोज 300 ते 400 गरीब व गरजूंना मोफत दोन वेळचे जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुसर्‍या टप्यातील मोफत अन्नदान सेवेचा प्रारंभ खालापूचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी त्यांच्या व हभप तानाजी महाराज यांच्या हस्ते ताकई विठ्ठल मंदिर परिसरातील भटका व्यवसाय करणार्‍या गरीब कुटुंबांना जेवण वाटप करण्यात आले. वासुदेव सेवा मंडळाकडून सकाळ-संध्याकाळी दोन वेळ अन्न शिजवून खोपोलीतील गरिबांना घरपोच पुरविण्यात येते. मंडळाचे किशोर ओसवाल, दिलीप देशमुख, श्रीकांत खरे व अन्य कार्यकर्ते या कामी मेहनत घेत असून  मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्याकडून येथील दैनंदिन स्वच्छता व खबरदारीच्या उपायांची देखरेख केली जात आहे. नगरसेवक किशोर पानसरे व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही मदत केली जात असून या माध्यमातून गरीब, गरजूंना दोन वेळच्या जेवणाची सुविधा उपलब्ध होत असल्याने त्यांच्यासमोरील महत्त्वाची अडचण दूर होत आहे. या निःस्वार्थ सेवेचे सर्वांकडून कौतुक होत असून तहसीलदार इरेश चप्पलवार, मुख्याधिकारी गणेश शेटे, पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्याकडूनही आवश्यक ते सहकार्य मिळत आहे.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply