आ. रविशेठ पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांचा पुढाकार

पेण ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये 3 मेपर्यंत वाढ झाल्याने रोजंदारी काम करणार्या नागरिकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशा गरजू व्यक्तींना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आमदार रविशेठ पाटील व नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या पुढाकाराने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. आमदार रविशेठ पाटील व नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या पुढाकाराने पेणमधील विविध प्रभागांतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शहरातील प्रभाग क्र. 7मधील कोळीवाडा, नरदास चाळ, प्रभाग क्र. 6मधील खान मोहल्ला तसेच नंदीमाळ नाका, शंकरनगर येथील गरीब, गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी पेण न. प.चे गटनेते अनिरुद्ध पाटील, सभापती देवता साकोस्कर, सभापती शहेनाझ मुजावर, नगरसेविका अश्विनी शहा, भाजप शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, उपाध्यक्ष अजय क्षीरसागर, माजी सभापती मयूर कुंभार, माजी नगरसेविका ज्योती म्हात्रे, भास्कर पाटील, कुणाल नाईक, राजू वनारसे, अश्विन शहा, साकिब मुजावर, अर्शद कच्छी आदी उपस्थित होते.