Breaking News

उरण पालिका हद्दीत स्वच्छतेला प्राधान्य

उरण : रामप्रहर वृत्त

उरण शहर कोरोनाच्या विळख्यात अडकू नये म्हणून शहराला स्वच्छ ठेवण्याचे काम उरण नगरपालिकेचे सफाई कर्मचारी करीत असल्याने त्यांचेही मोलाचे सहकार्य असल्याची चर्चा उरण शहरवासीयांत सुरू आहे. कोरोनाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात आमजनतेला याची भीती वाटत नाही. आजच्या घडीला उरणमध्ये 4 जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे काम असेल तरच घराच्या बाहेर पडण्याचे आवाहन शासकीय यंत्रणेकडून केले जात आहे. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी दिसत आहे. मात्र याही कठीण परिस्थितीत शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्याचे काम नगरपालिका कर्मचारी नित्यनेमाने सकाळी करीत आहेत. पहाटेच्या सुमारास नगरपालिका सफाई कर्मचारी रस्त्यावरील कचरा झाडू मारीत एका ठिकाणी गोळा करीत असतात. त्यानंतर गोळा केलेला हा कचरा गोळा करून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम नित्यनेमाने करीत आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड हे सफाई कर्मचारी पडू देत नाही. आजच्या या कठीण प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता शहर स्वच्छ ठेवणार्‍या सफाई कामगारांचे कार्यही मोलाचे असल्याची चर्चा उरण शहरवासीय करीत आहेत.

Check Also

भाजप सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करा -प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण

शिवसेना उबाठा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश अलिबाग : प्रतिनिधीसध्या भाजपचे सदस्य नोंदणी महाअभियान सुरू आहे. या …

Leave a Reply