Breaking News

उन्हाळी भातशेती कापणीस सुरुवात

माणगाव : प्रतिनिधी
उन्हाळी भातशेती कापणीस जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतात पाणी असताना व कोरोनाच्या साथीमुळे मजूर मिळत नसतानाही कुटुंबांतील सदस्यांसोबत शेतकर्‍यांनी कापणी सुरू केली आहे.
गेल्या वर्षी लांबलेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या पावसाने शेतीचे गणित पूर्ण बिघडविलेे. त्यामुळे पिकाचा हंगाम 20 ते 25 दिवसांनी पुढे गेला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी रब्बी पिकांकडे आशेने डोळे लावून बसले होते. अखेर शासनाच्या निर्देशांनुसार अंतर राखून भातकापणी केली जात आहे.
कोरोना साथीमुळे मजूर मिळणे कठीण होत आहे. दोनदा जेवण व 200 ते 250 रुपये मजुरी देऊनही मजूर मिळत नाहीत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन अनेक शेतकर्‍यांनी कापणीस सुरुवात केली आहे. कापणीनंतर झोडणीसाठी वेळ लागणार असल्याने बळीराजा सध्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.

Check Also

हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…

चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …

Leave a Reply