Breaking News

मुंबईत कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू; 281 नवे रुग्ण

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाचे संकट दिवसागणिक अधिकच गहिरे होत चालले आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या संसर्गामुळे 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 281 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील रुग्णांचा आकडा आता 4870 वर पोहोचला आहे. मुंबईत शनिवारी दिवसभरात 167 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 762 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तर मृत्यूचा आकडा 191वर पोहोचला आहे. शनिवारी मृत्यू झालेल्या 12 पैकी सात रुग्णांना अतिजोखमीचे आजार होते. मृतांमध्ये नऊ पुरुष आणि तीन महिला रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्यांपैकी एकाचे वय 40 वर्षांखालील होते, तर उर्वरित रुग्ण हे 40 ते 70 वर्षे वयोगटातील होते.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply