Breaking News

उलवे, कोप्रोली परिसर कंटेन्मेंट झोन घोषित

पनवेल : बातमीदार – पनवेल तालुक्यातील उलवे व कोप्रोली येथे एक एक व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना बाधित रुग्ण राहत असलेल्या उलवे येथील निल सिध्दी जोया सोसायटी, बी विंग, ही इमारत व कोप्रोली येथील फॉरच्यून गार्डन गृहनिर्माण संस्था, ई विंग, ही इमारत कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे.

या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply