Breaking News

कारागृहातून पळालेल्या दुसर्या आरोपीलाही बेड्या

अलिबाग : प्रतिनिधी – अलिबाग येथील कारागृहातून पळून गेलेल्या  दुसर्‍या आरोपीला  पोलिसांनी अटक केली. एक आरोपी जखमी झाल्यामुळे तो ताबडतोब सापडला. दुसर्‍या आरोपीला शुक्रवारी (दि. 22) रात्री कोलाड येथे अटक करण्यात आली.अलिबाग कारागृहातून कैदी पळून जाण्या घटना यापुर्वीही अशा घडल्या आहेत. या घटनेमुळे तुरुंग व्यवस्थापनातील त्रुटी समोर आळ्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.  बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेले दोन कैदी शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास अलिबागच्या कारागृहातून पळाले. कारागृहाच्या भिंतीवरून या दोघांनी उडी मारली. यातील एक जायबंदी झाल्याने पोलीसांच्या तावडीत सापडला. तर दुसरा पळून गेला. रात्री उशीरा त्याला कोलाडजवळ पोलिसांनी अटक केली.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply