कंटेन्मेंट झोन वगळून नियमानूसार रिक्षा, टॅक्सी सुरु करण्यात यावी

भाजप नेते निर्णुण कवळे यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त – कंटेन्मेंट झोन वगळता सुरक्षित पडदा अंतर कीट लाऊन तत्काळ रिक्षा व टॅक्सी सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतुक संघटनेचे उपाध्यक्ष निर्गुण रमेश कवळे यांनी केली आहे. या संदर्भात कवळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन दिले आहे.

कवळे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये दोन महिने घरात बसलेला रिक्षा टॅक्सी चालक या पुढे जगुच शकणार नाहीत, त्यावर उपासमारीची वेळ येईल, किरकोळ कमाई करणारा आणि आपले परिवार चालवणार्‍या चालकावर अत्यंत बिकट परस्थिती आलेली आहे, म्हणून चालक आणि प्रवासी यांच्या मध्यभागी सुरक्षित पडदा अंतर कीट लाऊन रिक्षा व टॅक्सी चालू करावी यातून दोन गोष्टी समोर येऊ शकतात.

एक म्हणजे चालकाला रोजगार आणि प्रवासासाठी सुविधा,  असंख्य ठिकाणी रुग्ण हॉस्पिटलपर्यंत पोचवण्याकरीता रुग्णवाहिका वेळेवर पोहचत नाहीत, तसेच कामगारांच्या स्थलांतराकरीता व मजुर कष्टकरी यांना रोजगारा(कारखाना)पर्यंत ये जा करण्याकरीता रिक्षा टॅक्सी चालू करणे अत्यंत महत्वाचे आणि गरजेचे आहे. रुग्णाची संख्या वाढत असल्याने अपुर्‍या रुग्णवाहिकेचे काही प्रमाणात काम रिक्षा व टॅक्सी करू शकतील तथा रुग्णांवर वेळेवर उपचार होऊ शकेल, स्थलांतर आणि रुग्ण तसेच रिक्षा, टॅक्सी चालक यांच्या प्रश्नांवर विचार करून लवकरात लवकर टॅक्सी रिक्षा चालू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच निवेदनाची प्रत मुंबई परिवहन मंत्रालयातही देण्यात आली आहे.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply