खालापूर : प्रतिनिधी
खोपोलीत विणानागर परिसरात सोमवारी (दि. 25) सकाळी रस्त्यावर पडलेल्या कचर्याच्या पिशवीत दोन हजारांच्या बनावट नोटा आढळल्या. पोलिसांनी पाचारण केल्यावर हा खुलासा झाला.
खोपोली शहरातील विणानगर परिसरात मॉर्निंग वॉकला जाताना व्हीडीएम स्कूलच्या जवळ कचर्याच्या पिशवीत दोन हजारांच्या नोटा नागरिकांना दिसल्या. ही बाब खोपोली पोलिसांच्या लक्षात आणून देताच ठाणे अंमलदार शीद व सहकार्यांनी धाव घेतली. पोलिसांनी या नोटांची प्रत्यक्ष तपासणी केली असता, त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper