Breaking News

पनवेल परिसरात नवनवीन उद्योग धंदे लवकरच येणार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
येणार्‍या दोन ते तीन महिन्यांतच लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे. त्यामुळे नवनवीन उद्योग धंदे आपल्या भागात आता येणार आहेत, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते पनवेल शहरातील विरूपाक्ष हॉलमध्ये महिलांसाठी आयोजित नवउद्योजकांची कार्यशाळेत बोलत होते.
महिलांसाठी नवउद्योजकांची कार्यशाळेच आयोजन रविवारी (दि.29) करण्यात आले होते. पनवेल महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष माजी नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या वतीने पनवेल वूमन स्टार्ट अप क्लब या शीर्षकाखाली कार्यशाळेच आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. आपण ज्या विभागात राहतोय त्या विभागात येणार्‍या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. येणार्‍या दोन ते तीन महिन्यातच लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे.
नवनवीन उद्योग धंदे आपल्या भागात आता येतील, पण आपण उद्योग धंद्यात उतरून यशस्वी झाले पाहिजे, असे मत या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले.
रुचिता लोंढे ह्या गेली अनेक वर्ष सातत्याने वेगवेगळे उपक्रम आपल्या माध्यमातून राबवत आलेले आहेत ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवून आपल्याला निवडून दिले त्यांच्या साठी वेगवेगळे उपक्रम यशस्वीरित्या आयोजन करण्यात रूचिता लोंढे यांचे कौतुकच करावे लागेल, असेही आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी वेगवेगळे उपक्रम आपण सातत्याने राबवत असतो. प्रत्येक प्रभागात 200 महिलांना शिलाई मशीनचे वाटप आणि 200 महिलांना घरघंटीचे वाटप हा नवीन उपक्रम राबवत आहोत. याची नाव नोंदणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयात सुरू करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी या कार्यक्रमादरम्यान सांगितले.
या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर उत्तर रायगड जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष अविनाश कोळी, मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर शोभा राऊळ, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, भाजपचे शहराध्यक्ष सुमित झुंजारराव, केदार भगत, पनवेल शहराचे सरचिटणीस अमित ओझे,पवन सोनी, चिन्मय समेळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply