Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना अन्नदान

पनवेल : रामप्रहर वृत्त – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवारी (दि. 2) राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल व पत्रकार मित्र असोशिएशन यांच्या माध्यमातून व रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी राबविलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब भोजन या संकल्पनेतून पनवेल तालुक्यातील पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी, कामोठे, डेरवली याठिकाणी परिसरातील गोर-गरीब व गरजू नागरिकांना एकदिवासिय भोजन सेवा राबविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभरात एकही माणूस उपाशीपोटी झोपला नाही पाहिजे. त्यासाठी आम्ही आमच्या संस्थेतर्फे हा भोजन सेवा पुरविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, असे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी यावेळी सांगितले.

Check Also

यशाचा सोहळा; सामना, बनवाबनवी, माहेरची साडी… आणि ‘देऊळ बंद २’चा

यश हे सर्वाधिक ताकदवान टॉनिक… चित्रपटाच्या जगात यशाचे नाणं कायमच चालणारं. सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे. जपून …

Leave a Reply