पेण ः प्रतिनिधीपेण रामवाडी ब्रिजजवळ रेल्वे अपघातात तीन जण ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. पेण चिंचपाडा येथील सुशील वर्मा (24), सुनील वर्मा (25) व निखिल गुप्ता (25) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे युवक शनिवारी रात्रीच्या सुमारास रामवाडी रेल्वे ब्रिजच्या पुढे वडखळ बाजूकडे स्टोन क्र. 104/2जवळ बसले असताना मालगाडीने त्यांना उडविले. अपघाताची माहिती मिळताच पेण उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव यांच्यासह पेण पोलीस निरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी सपोनि. महेश कदम अधिक तपास करीत आहेत.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper