Breaking News

सौर पथदिव्यांनी उजळून निघाल्या बेकरेवाडीच्या वाटा

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बेकरेवाडी येथील रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सौर पथदिवे बसविण्यात आले आहेत. या सौर पथदिव्यांमुळे विजेची मोठी बचत होणार असून रात्रीच्या वेळी येथून अंधारातून वाट काढणार्‍या ग्रामस्थांना आधार मिळाला आहे. ग्रामपंचायतीने यासाठी 14व्या वित्त आयोगाच्या निधीमधून साधारण दोन लाख रुपयांची तरतूद केली आहे. या सौर पथदिव्यांमुळे बेकरेवाडीच्या वाटा उजळल्या असून ग्रामस्थांमधून याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

माथेरानच्या डोंगररांगेत वसलेल्या बेकरेवाडी येथील काही वाड्यांना जुमापट्टी धनगरवाडा येथून गावात जाण्यासाठी जंगलमार्गातून सुमारे एक ते दीड किलोमीटर जावे लागते. त्याकरिता रात्री येथून गावात जाण्यासाठी अनेक ग्रामस्थांना अंधारातून वाट काढावी लागत होती. त्यामुळे या ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी येथील स्थानिक ग्रामपंचायत सदस्या कल्पना जैतू पारधी यांनी केली होती. या मागणीचा विचार करीत व आधुनिकतेची कास धरत माणगाव तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्याणी कराळे, उपसरपंच तानाजी टोकरे यांच्या संकल्पनेतून व ग्रामविकास अधिकारी संतोष पवार व इतर सदस्यांच्या सहकार्यातून बेकरेवाडीपर्यंत एकूण 10 सौर पथदिवे लावण्यात

आले आहेत.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply