Breaking News

रायगडात कोरोनाचा उच्चांक; तब्बल 142 नवे रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 24) तब्बल 142 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात एवढे रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 95, पनवेल ग्रामीणमधील 27, उरण तालुक्यातील 10, खालापूर तालुक्यातील चार, रोहा तालुक्यातील तीन, तर कर्जत, पेण व मुरूड तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. दुसरीकडे दिवसभरात पनवेल महापालिका हद्दीतील दोन आणि पनवेल ग्रामीणमधील एक अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2746वर जाऊन पोहोचला असून, मृतांची संख्या 113 इतकी झाली आहे. अनलॉक झाल्यापासून रुग्ण व मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे.

Check Also

निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …

Leave a Reply