पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या तब्बल 160 रुग्णांची नोंद गुरुवारी (दि. 25) झाली, तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात पहिल्यांदाच एवढे रुग्ण आढळले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 82, पनवेल ग्रामीणमधील 36, अलिबाग तालुक्यातील नऊ, खालापूर तालुक्यातील आठ, उरण व कर्जत तालुक्यातील प्रत्येकी सात, पेण तालुक्यातील चार, माणगाव व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी तीन आणि तळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. मृत रुग्ण पनवेल मनपा, खालापूर, श्रीवर्धन व महाड येथील प्रत्येकी एक आहे. दुसरीकडे दिवसभरात 48 रुग्ण बरे झाले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 2906वर पोहोचला असून, मृतांची संख्या 117 झाली आहे.
Check Also
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर
खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …
RamPrahar – The Panvel Daily Paper