Breaking News

सर्पमित्रांनी अजगराच्या पिलांना दिले जीवदान

उरण : प्रतिनिधी

वन्यजीव निसर्ग संरक्षण सर्पमित्र संस्थेच्या सदस्यांनी दोन दिवसांत चार अजगराच्या पिलांना जीवदान दिले असून, त्यांना वनरक्षकांच्या उपस्थितीत जंगलात सोडण्यात आले.अजगर जातीचा साप हा शेड्यूल्ड 1मध्ये मोडत असल्याने त्याचे वन कायदे कडक करण्यात आले आहेत.

उरण परिसरात सर्पमित्र, निसर्गमित्र सतर्क असल्यामुळे या परिसरात अनेक वन्यप्राणी, साप वाचविले जात आहेत. तसेच सापांबद्दल समज-गैरसमज दूर करून समाजप्रबोधनाचे काम वन्यजीव निसर्ग संरक्षण सर्पमित्र संस्थेचे सदस्य करीत आहेत. त्यामुळेच विविध भागात कोणाच्या घरात अथवा घराबाहेर पडवीमध्ये कोणताही साप अथवा प्राणी-पक्षी आढळल्यास संस्थेच्या सदस्यांना फोन करून बोलाविले जाते.

कलंबुसरे गावात कुलदीप नाईक यांच्या घराजवळ सर्पमित्र शिवप्रसाद भेंडे यांनी अजगराची पिले पकडली तसेच चिर्ले गावात रात्रीच्या सुमारास आढळून आलेली दोन अजगराची पिले तेथील निसर्ग वन्यजीव संरक्षण सर्पमित्र संस्थेचे उपाध्यक्ष आनंद मढवी यांनी पकडली असून त्या अजगराच्या पिलांना वनरक्षकांच्या उपस्थितीत जंगलात सोडण्यात आले. या वेळी वनरक्षक सुरदार धांडे, वनरक्षक के. सी. देवकर, वनरक्षक मिलिंद भोईर, वनरक्षक माया भोसले, वनरक्षक सुप्रिया कसबे, निसर्ग वन्यजीव संरक्षण सर्पमित्र संस्थेचे उपाध्यक्ष आनंद मढवी, महेश भोईर, विनीत मढवी, बंटी शेळके आदी उपस्थित होते.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply