Breaking News

रायगडातील किल्ले, समुद्रकिनार्‍यांवर जाण्यास पर्यटकांना 31 मार्चपर्यंत बंदी

अलिबाग : जिमाका

शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू केला आहे. या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील किल्ले आणि समुद्रकिनारी होणारी गर्दी लक्षात घेता तेथे जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय 31 मार्चपर्यंत अनिवार्य असणार आहे.

किल्ले तसेच समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन त्याद्वारे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व किल्ले व समुद्र किनार्‍यांवर पर्यटकांसाठी प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. साथरोग अधिनियम 1897 आणि महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020 नुसार पर्यटकांना 31 मार्चपर्यंत ही बंदी असणार असल्याचे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

-माथेरानमध्येही नो एण्ट्रीरायगड जिल्ह्यातील माथेरान येथील पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर लोक पर्यटनासाठी येत असतात. यामुळे या ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊन त्याद्वारे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर माथेरानमध्ये पर्यटकांसाठी प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून साथरोग अधिनियम 1897 व महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020 नुसार माथेरान या पर्यटनस्थळावर जाण्यासाठी सर्व पर्यटकांना 31 मार्चपर्यंत बंदी घालण्याचे आदेश देत आहोत, असे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

Check Also

युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हेल्मेट वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश …

Leave a Reply