Breaking News

मोहोपाडा हद्दीत कोरोनाचे संकट गडद; सात नव्या रुग्णांची भर; एकाचा मृत्यू

मोहोपाडा : प्रतिनिधी

वासांबे (मोहोपाडा) हद्दीत कोरोनाचा फैलावर वाढत असून नविन पोसरी येथील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी नव्याने सात जणांचे कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आले असून वासांबे (मोहोपाडा) हद्दीत एकूण 94 जण कोरोनाने बाधित झाले आहेत. तर पंचवीस जण बरे होवून घरी परतले आहेत.

आढळलेल्या रुग्णांमध्ये वासांबे मोहोपाडा शुक्रवारी दुपारपर्यंत खाने आंबिवली एकूण चार यात 42 व 68 वर्षीय महिला, 19 वर्षीय दोन तरुण, आळी आंबिवली एक 81 वर्षीय महिला, मोहोपाडा बॉम्बे डाईंग कॉलनी एक 56 वर्षीय पुरुष, नवीन पोसरी 34 वर्षीय  पुरुष असे शुक्रवारी सात जणांना कोरोनाची बाधा होवून वासांबे मोहोपाडा हद्दीत एकूण 94 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील नवीन पोसरी येथील एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. वासांबे हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या गेल्या पंधरा दिवसांपासून रोजच वाढत चालल्याने वासांबे हद्द कोरोनाचे हॉटस्पॉट होवू पाहतोय, यासाठी परीसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामपंचायत व प्रशासनाने एकत्रित येऊन कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तर नजिकच्या चौक येथे शुक्रवारी 15 जणांचे अहवाल पॉजिटिव्ह आल्याची माहिती चौक मंडळ अधिकारी नितिन परदेशी यांनी दिली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply