नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरात सर्वत्र कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून, कोविड-19 चाचणीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. हे लक्षात घेत आत्मनिर्भर भारत अंतर्गत सगळ्यात स्वस्त कोरोना टेस्ट किट केंद्र सरकारच्या वतीने मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी बुधवारी (दि. 15) लाँच केले.
दिल्ली आयआयटीने या स्वस्तातील कोरोना टेस्ट किटची निर्मिती केली आहे, तर न्यूटेक मेडिकल कंपनी हे किट बाजारात उपलब्ध करणार आहे. ‘कोरोश्योर’ असे या किटचे नाव
असून, त्याला आयसीएमआर आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे.
‘कोरोश्योर’मुळे देशात कोरोना चाचण्यांच्या पद्धतीमध्ये मोठा बदल होऊन चाचण्यांची संख्या आणि किंमत यामध्ये फरक दिसेल. या किटद्वारे परवडणार्या दरात महिन्याला 20 लाख चाचण्या करणे शक्य आहे, असे आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही. रामगोपाल राव यांनी सांगितले.
Check Also
पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा
मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …
RamPrahar – The Panvel Daily Paper