Breaking News

भाजप नेते विक्रांत पाटील यांच्याकडून वादळग्रस्तांना मदत

पनवेल : वार्ताहर
भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी त्यांचा वाढदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तसेच कोकणातील निसर्ग चक्रीवादळ यामुळे साजरा न करता आपल्या बांधवांना एक लाख एक हजार रुपयांची मदत केली आहे.
आपद्ग्रस्तांना सहाय्य म्हणून खारीचा वाटा उचलत विक्रांत पाटील यांनी मदतीचा धनादेश माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सोबत होते. याव्यतिरिक्त राज्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मदत केली आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply