पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या 351 रुग्णांची नोंद शनिवारी (दि. 18) झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 183 (महापालिका 125 व ग्रामीण 58), खालापूर 45, अलिबाग 35, पेण 32, उरण 29, महाड 16, कर्जत नऊ आणि श्रीवर्धन तालुक्यातील दोघांचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल तालुक्यातील तीन (मनपा दोन व ग्रामीण एक) आणि महाड तालुक्यातील एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 370 रुग्ण बरे झाले आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 9914वर पोहोचला असून, मृतांची संख्या 260 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6225 रुग्णांनी कोरानावर मात केल्याने विद्यमान रुग्ण 3478 आहेत.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …