Breaking News

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि माजी सरपंच नरेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जीवनावश्यक

अन्नधान्याचे वाटप

वाकडी (ता. पनवेल) : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी सरपंच नरेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजप नेते राजेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, पं. स. सदस्य राज पाटील, तसेच सरपंच संदीप पाटील, माजी सरपंच नामदेव जमदाडे, विलास चोरघे, नाना पाटील, पोलीस पाटील कचेरशेठ पाटील, भाजप अध्यक्ष संतोष पाटील, चिंध्रण विभाग चिटणीस पद्माकर म्हस्कर, युवा नेते बलराम पाटील, मंगेश पाटील, गोटीराम पाटील, जयदास पाटील, गणेश पाटील, धनंजय पाटील, रवी पाटील, विश्वनाथ पाटील, शशिकांत खुटले, राज पाटील आदी उपस्थित होते.

रोगप्रतिकारक गोळ्यांचे आदिवासी वाड्यांवर वाटप

करंबेळीवाडी (ता. पनवेल) : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. संतोष आगलावे यांनी रोगप्रतिकारक गोळ्यांचे आदिवासी वाड्यांवर वाटप केले.

नगरसेविका संजना कदम यांच्यामार्फत मोफत मास्क व गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप

खारघर ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 6च्या नगरसेविका संजना कदम यांच्यामार्फत मंगळवारी वास्तुविहार से. 16 खारघर येथील वाचनालयात परिसरातील नागरिकांसाठी मोफत मास्क व गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप करण्यात आले.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply