खोपोली : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस बुधवारी (दि. 22) सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त खोपोली भाजप युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन समारंभास माजी आमदार देवेंद्र साटम, अॅड. राजेंद्र येरुणकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, खोपोली भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, महापालिका परिवहन सभापती तुकाराम साबळे, नगरसेविका अपर्णा मोरे, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष सचिन मोरे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अजय इंगुळकर, सरचिटणीस विनायक माडपे, महिला शहर अध्यक्ष शोभा काटे, भाजप शहर सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, दिलीप पोवार, पुनित तन्ना, सूर्यकांत
देशमुख, संजय म्हात्रे, राहुल जाधव, राकेश दबके, सिद्धेश पाटील, दिलीप देशमुख, गोपाळ बावसकर, क्रिश पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper