पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 22) कोरोनाचे 199 नवीन रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 242 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 148 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 198 रूग्ण बरे झाले आहेत. ग्रामीणमध्ये 51 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 44 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
पनवेल महापालिका पनवेल ख्वाजा नगरमधील एका व्यक्तीचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. नवीन पनवेल सेक्टर 8 क्लासिक स्टर्लिंग सोसायटी, ओम शिवा कॉम्प्लेक्स, तळोजा गोल्डन टावर, पनवेल नाझम अपार्टमेंट आणि जे. के. पार्कमधील व्यक्तींचा मृत्यू पूर्वीच झाला असून त्यांचा दाखला बुधवारी प्राप्त झाला आहे.
बुधवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 23 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 900 झाली आहे. कामोठेमध्ये 30 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1107 झाली आहे. खारघरमध्ये 26 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1016 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 36 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 867 झाली आहे. पनवेलमध्ये 26 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1049 झाली आहे. तळोजामध्ये सात नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 311 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 5250 रुग्ण झाले असून 3744 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.31 टक्के आहे. 1379 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 127 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांत उलवे 11, ओवळे सहा, आदई सहा, करंजाडे पाच, शिरढोण चार, सुकापुर तीन, आंबिवली तीन, विचुंबे दोन, वावेघर , वलप , वहाळ, उसर्ली, साई, कोप्रोली, घोसाळवाडी, गव्हाण, देवद, दापीवली, चिखले, येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच शिरढोण व गुळसुंदे येथील व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचा दाखला बुधवारी प्राप्त झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाग्रस्तांची एकुण संख्या 1702 झाली असून 1168 जणांनी कोरोनावर मात केली असून 34 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत 303 जणांना लागण
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत बुधवारी 303 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोना बधितांची एकूण संख्या 12 हजार 269 तर 207 जण बरे होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची सात हजार 925 झाली आहे. दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 358 झाली आहे.
नवी मुंबईत आतापर्यंत 30 हजार 404 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 17 हजार 786 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. सद्य स्थितीत नवी मुंबईत 3 हजार 986 रुग्ण उपचार घेत आहेत. आढळलेल्या रुग्णांच्या विभागवार आकडेवारीत बेलापूर 35, नेरुळ 60, वाशी 26, तुर्भे 11, कोपरखैरणे 58, घणसोली 55, ऐरोली 47 व दिघा 11 असा समावेश आहे.
महाडमध्ये 33 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद
महाड : प्रतिनिधी
महाडमध्ये बुधवारी 33 जणांना कोरोनाची लागण झाली असून, दोन जन बरे झाले आहे. महाडमध्ये एकुण 237 रुग्णांची नोंद झाली आहे.
आढळलेल्या रुग्णांमध्ये चवदारतळे चार, नांगलवाडी 12, बिरवाडी नऊ, नवेनगर दोन, रोहीदासनगर, प्रभातकॉलनी, जुना पोस्ट, 4डी कबल, मोहल्ला तुडील, सनाशेख हॉस्पिटल येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर वहुर व स्नेहा सोसायटी नांगलवाडी येथील दोन रुग्ण बरे झाले आहेत. महाडमध्ये 94 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 128 बरे झाले आहेत. एकुण 237 रुग्णांची नोंद झाली आहे.
अलिबाग तालुक्यात 25 नवे रुग्ण
अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यात बुधवारी 25 नवे रुग्ण आढळून आले. त्यात अलिबाग कारागृहातील सहा कैद्यांचा समावेश आहे. मंगळवारी दोन कैदी आढळले होते. त्यामुळे कोरोनाबाधित कैद्यांची संख्या आठ झाली आहे.
अलिबाग तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 764वर पोहोचली आहे. यातील 371 जण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 372 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत, अशी माहिती अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.
कर्जतमध्ये नऊ जण कोरोनाग्रस्त
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
कर्जत तालुक्यात बुधवारी कोरोनाचे नऊ रुग्ण आढळले असून आजपर्यंत तालुक्यातील रुग्णांची संख्या 360वर गेली आहे. यापैकी 266 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील नानामास्तर नगर 44 वर्षीय व्यक्ती, गौरकामत येथील 69 वर्षीय व्यक्ती, दहीवलीमध्ये 15 वर्षीय मुलगी, भिसेगाव बस स्टँड 22 वर्षीय युवक, गुंडगे गावातील 60 वर्षीय महिला, मुद्रे बुद्रुक गावातील 54 वर्षीय व्यक्ती, नेरळमधील राजेंद्र गुरुनगर सहा वर्षीय बालक, नेरळ नजीकच्या दामत गावातील 74 वर्षीय व्यक्ती, नेरळ मधील हेटकर आळीमध्ये 39 वर्षीय युवक यांचा समावेश आहे.
उरण तालुक्यात 18 जणांना कोरोना संसर्ग
उरण : वार्ताहर
उरण तालुक्यात बुधवारी 18 रुग्ण आढळले असून 41 रुग्ण पूर्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या 675 झाली असून त्यातील 515 बरे झालेले रुग्ण आहेत.
आढळलेल्या रुग्णांत बोकडवीरा तीन, जेएनपीटी टाऊनशिप दोन, जेएनपीटी तीन, कमल 4 सीएनएडी, करंजा, डोंगरी, करळ, गणेश नगर, मुळेखंड, नागाव, म्हातवली, मराठी शाळेजवळ, सोनारी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तालुक्यात आता 139 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी महिती उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
सुधागड तालुक्यात आढळले चार पॉझिटिव्ह
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यात बुधवारी एकाच दिवशी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये परळी येथे तीन आणि पाली येथे एक असे चार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे सुधागड तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या चार रुग्णांवर वावळोली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कातील लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली आहे. तालुक्यात कोरोना बधितांची संख्या 15 असून यातील सात जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आणि सात जणांवर उपचार सुरू आहेत. असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी सांगितले.
रोहा तालुक्यात 24 जण बाधित
रोहे : प्रतिनिधी
रोहा तालुक्यात बुधवारी रोहा शहरात 17 तर ग्रामीण भागात सात असे एकूण 24 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत. या मध्ये 12 पुरुष व 12 महिलांचा समावेश आहे. या कोरोना बाधितामध्ये 60 वर्षावरील वयोवृध्द 4 व 15 वर्षाखालील चार मुलांचा समावेश आहे. रोहा तालुक्यात एकुण कोरोनाबाधित 398वर आहे. बुधवारी सहा रुग्ण बरे झाल्याने कोरोनावर मात करणार्या व्यक्तींची संख्या 293 वर पोहचली आहे. आतापर्यंत नऊ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर 96 रुग्णांवर उपचार चालु आहेत.