Breaking News

मावळमधून खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाची हॅट्ट्रिक; संजोग वाघेरेंवर मात

पुणे : रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार तथा शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व उद्धव ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे-पाटील यांचा सुमारे 96 हजार 615 मतांनी पराभव केला.
खासदार श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यात सरळ लढत झाली होती. मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच बारणे यांनी आघाडी घेतली होती. निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार महायुतीचे बारणे यांना सहा लाख 92 हजार 832, तर पाटील यांना पाच लाख 96 हजार 217 एवढी मते मिळाली.
विजय दृष्टिपथात असल्याचा अंदाज आल्यानंतर बारणे हे समर्थकांसह बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर आले. या वेळी त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष करीत घोषणाबाजी केली. महायुतीचा विजय असो, झाली रे झाली हॅट्ट्रिक झाली, घासून नाही ठासून आलो अशा घोषणा समर्थकांनी दिल्या. महायुतीच्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी गुलाल उधळत, फटाके वाजवत आनंद व्यक्त केला.
महायुतीचे कार्यकर्ते, नेत्यांना विजयाचे श्रेय!
विजयानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मावळच्या जनतेने तिसर्‍यांदा माझ्यावर विश्वास टाकला आहे. मावळमधील सहाही आमदार, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यांच्या मेहनतीचा विजय आहे. दहा वर्षे मतदारसंघात नागरिकांशी एकरूप राहून काम केले. जनतेने माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. त्यांचे आभार मानतो. मतदारांना, महायुतीचे कार्यकर्ते, नेत्यांना विजयाचे श्रेय देतो.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply