Breaking News

शासकीय कर्मचार्‍यांना पिटाळले; बोडणी ग्रामस्थांवर गुन्हा दाखल

अलिबाग : प्रतिनिधी

गावात रुग्ण तपासणीसाठी गेलेल्या शासकीय कर्मचार्‍यांना गावातून हुसकावून लावणार्‍या अलिबाग तालुक्यातील बोडणी ग्रामस्थांविरुद्ध मांडावा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा, साथरोग अधिनियन, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाद्वारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बोडणी येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून कंटेन्मेंट झोनचे नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत. अलिबाग तालुक्यातील बोडणी गावात कोरोनाचे 72 रुग्ण आढळूनही ग्रामस्थ यंत्रणेला सहकार्य करत नाहीत, नियम पाळत नाहीत. म्हणून बुधवारी ( दि. 22) तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकारी ग्रामस्थाना समजावण्यासाठी गेले होते. त्यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थानी शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना पिटाळून लावले. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतली असून कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार यांना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 30 ते 35 जणांवर दाखल करण्यात आला आहे. मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी धर्मराज सोनके याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

Check Also

राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पनवेल महापालिकेला प्रशस्तीपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या …

Leave a Reply