Breaking News

रायगडात तब्बल 464 नवे रुग्ण; 11 जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 464 नव्या रुग्णांची शुक्रवारी (दि. 24) नोंद झाली असून, 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 158, ग्रामीण 38) तालुक्यात 196, पेण 56, खालापूर 46, महाड 43, अलिबाग 34, उरण 29, रोहा 19, कर्जत 12, मुरूड व माणगाव प्रत्येकी नऊ, सुधागड व पोलादपूर प्रत्येकी चार, म्हसळा दोन आणि श्रीवर्धन तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल तालुक्यात सात (मनपा सहा, ग्रामीण 1), महाड दोन, उरण व खालापूर तालुक्यातील प्रत्येकी एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 512 रुग्ण बरे झाले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 12933वर पोहोचला असून, मृतांची संख्या 334 इतकी झाली आहे. जिल्ह्यात 8472 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने सध्या 3663 रुग्ण सक्रिय आहेत.

Check Also

युवा शक्ती जागर यात्रेनिमित्त कृष्णराज महाडिक यांचा उत्तर रायगड दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष व युथ आयकॉन कृष्णराज महाडिक मंगळवार …

Leave a Reply