Breaking News

कर्जत तालुक्यात 16 पॉझिटिव्ह

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

कर्जत तालुक्यात रविवारी कोरोनाचे 16 रुग्ण आढळले असून आजपर्यंत तालुक्यातील रुग्णांची संख्या 430 वर गेली आहे तर आतापर्यंत 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आढळलेल्या रुग्णांमध्ये कर्जत ग्रामीण क्षेत्रात आठ व कर्जत नगर परिषद क्षेत्रात  आठ रुग्ण आहेत. यात भिसेगाव येथील 44, 40, 55 वर्षीय व्यक्ती, कडाव मधील 47 वर्षीय महिला, कोतवाल नगर मधील 26 वर्षीय तरुण, कळंब येथील 67 वर्षीय महिला, नेरळमधील माथेरान 84 वर्षीय व्यक्ती, गुंडगे गावातील 51 व 48 वर्षीय व्यक्ती, आंनद नगरमधील 40 वर्षीय व्यक्ती, भिसेगाव मधील 58 वर्षीय महिला, कडाव नजीकच्या कळंबोली गावातील 25 वर्षीय तरुण, नेरळ स्टेशन आळीतील माथेरान टॅक्सी स्टँड जवळ राहणारा 56 वर्षीय व्यक्ती, डीकसळ येथील 48 वर्षीय व्यक्ती, मोहाची वाडी येथील 38 वर्षीय तरुण यांचा समावेश आहेत.

माणगाव तालुक्यात 11 नवे कोरोनाग्रस्त

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव तालुक्यात रविवारी 11 नवे कोरोनाग्रस्त आढळले असल्याने तालुक्याची एकुण रुग्णसंख्या 264 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये माणगाव नगरपंचायत हद्दीत चार, गोरेगाव गावांत तीन, मोर्बा गावांत एक, पन्हळघर गावांत एक, निजामपूर गावांत एक व लोणेरे गावांत एक अशा एकूण 11 नव्या कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी प्रसार माध्यमांना दिली.आतापर्यंत 177 बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तिघांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात 84 रुग्ण उपचार घेत आहे.

सुधागड तालुक्यात सहा नवे रुग्ण

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात रविवारी एकाच दिवशी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता सुधागड वासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.सुधागड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या आता 26 वर पोहचली आहे. यातील 10 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आणि 15 जणांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली आहे.

नवी मुंबईत 388 जण बाधित, 10 जणांचा मृत्यू; 205 रुग्ण कोरोनामुक्त

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत रविवारी 388 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोना बधितांची एकूण संख्या 13 हजार 618 तर 205 जण बरे होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची आठ हजार 830  झाली आहे. रविवारी 10 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 388 झाली आहे. नवी मुंबईचा रिकव्हरी रेट 65 टक्क्यांवर स्थिरावला आहे. सद्य स्थितीत नवी मुंबईत चार हजार 400 रुग्ण उपचार घेत आहेत. आढळलेल्या रुग्णांची नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 49, नेरुळ 59, वाशी 47, तुर्भे 25, कोपरखैरणे 79, घणसोली 54, ऐरोली 64  दिघा 11 असा समावेश आहे.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply