Breaking News

खोपोलीत उद्यानाचे नामकरण

खोपोली : प्रतिनिधी

येथील नगर परिषदेच्या वतीने विद्यानगर येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या उद्यानाचे रविवारी (दि.10) कै. डॉ. नरहर विष्णू भालेराव उद्यान असे नामकरण करण्यात आले.

 जनता विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक स. के. आपटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील भालेराव यांनी केले. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, उल्हास देशमुख, रामकृष्ण तावडे, वृंदा भालेराव, स. के. आपटे यांनी भालेराव सरांच्या बाबतीतल्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनीही मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र घोडके यांनी केले. उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, आरोग्य सभापती प्रमिला सुर्वे, नगरसेवक मोहन औसरमल, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष नरेंद्र हर्डीकर, खोपोलीतील प्रथितयश व्यापारी रामविलास जाखोटिया, हस्तीमल ओसवाल, राजन सूर्वे, रविंद्र बेलसरे, जगदीश जाखोटिया, दिनकर कुंभार, अनिल कुलकर्णी यांच्यासह विद्यानगर परिसरातील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुधीर भालेराव यांनी आभार मानले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply