दोघांचा मृत्यू; 132 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 28) कोरोनाचे 131 नवीन रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 132 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 91 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 105 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 40 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 27 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात 91 नवीन रुग्ण आढळले असून 110 यापूर्वीच्या रुग्णांची नोंद पत्ते पूर्ण नसल्याने घेतली नव्हती त्यांची नोंद मंगळवारी करण्यात आली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. खारघर सेक्टर 20 फोनिक्स सोसायटीतील आणि नवीन पनवेल मधील हरी आशीर्वाद अपार्टमेंट मधील व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मंगळवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 22 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1092 झाली आहे. कामोठेमध्ये 14 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1290 झाली आहे. खारघरमध्ये 19 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 1200 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 12 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1042 झाली आहे. पनवेलमध्ये 18 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1220 झाली आहे. तळोजामध्ये 6 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 380 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 6224 रुग्ण झाले असून 4618 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.20 टक्के आहे. 1454 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 152 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन 40 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये उलवे 10, चिंध्रण सहा, करंजाडे पाच, गव्हाण पाच, सुकापूर तीन, आजीवली दोन, पळस्पे, वाजे, कोळखे, पाले बुद्रुक, केळवणे, चिपळे, भोकरपाडा, आरीवली आणि आपटे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तसेच 27 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीण कोरोना पॉझिटिव्हची संख्या 1966 झाली असून 1522 जणांनी कोरोनावर मात केली असून 44 जणांचा मृत्यू झाला आहे.
कर्जत तालुक्यात 11 नवे पॉझिटिव्ह
चार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
कर्जत तालुक्यात सोमवारी 11 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत मृतांची संख्या 16 वर गेली असून एकूण कोरोना रुग्ण बाधित 454 झाले आहेत तर आतापर्यंत 336 रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी आले आहेत. आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील दहिवली भागातील 61 वर्षीय व्यक्ती, एसटी आगार परिसरात राहणार्या एका कुटुंबातील 35 वर्षीय महिला व 11 वर्षीय मुलगी, 51, 43 वर्षीय पुरुषांचा, 15 वर्षीय मुलगा, बारणे-साळोख परिसरातील 43 वर्षीय व्यक्ती, शहरातील एका ज्वेलर्सचे दुकान असलेला 43 वर्षीय आणि मोबाइलचे दुकान चालविणारा 46 वर्षीय व्यक्ती, तालुक्याच्या ग्रामीण भागातील 56 वर्षीय महिला, मुद्रे भागात राहणारी 31 वर्षीय युवती यांचा समावेश आहे. तसेच मंगळवारी मृत्यू जाहीर केलेल्यांमध्ये कर्जत नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, मानिवली ग्रामपंचायतीचे सरपंच, कर्जत शहरातील प्रसिद्ध वडा पाव वाले आणि कळंब येथील 65 वर्षांच्या महिलेचा समावेश आहे.
महाडमध्ये 25 जण कोरोनामुक्त
दिवसभरात दोघांना संसर्ग
महाड : प्रतिनिधी
महाड तालुक्यात मंगळवारी 25 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर केवळ दोघांना लागण झाली आहे आणि एकाचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये कांबळे तर्फे बिरवाडी 47 वर्षीय पुरुष आणि पिडीलाईट सो. 28 पुरुष पुरुष यांचा समावेश आहे. तर तुडील येथील 75 पुरुष महिलेचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 126 रुग्ण उपचार घेत असुन, अजुनपर्यंत 214 रुग्ण बरे झाले आहेत. अजुनपर्यंत महाड मध्ये 361 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
उरण तालुक्यात पाच जणांना कोरोना
दोघांचा मृत्यू; 11 रुग्णांना डिस्चार्ज
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण तालुक्यात मंगळवारी कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात दोन रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 11 रुग्ण पूर्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये डोंगरी, जेएनपीटी टाऊनशिप, दादरपाडा, मुळेखंड तेलीपाडा, कोटनाका उरण येथे प्रत्येकी एक एकूण पाच रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये जांभूळपाडा तीन, नवघर, वेश्वी, चिरनेर, मुळेखंड, उरण, उरण(क्लासिक अॅव्हेनिव्ह), बोकडवीरा, जेएनपीटी टाऊनशीप येथे प्रत्येकी एक एकूण 11 रुग्णांचा समावेश आहे. तर मुळेखंड तेलीपाडा व कोटनाका उरण येथील दोघांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 810 झाली आहे. त्यातील 621 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 163 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आज पर्यंत 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी महिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
नवी मुंबईत बळींची संख्या 400 पार
320 नवे बाधित; आठ जणांचा मृत्यू
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत मंगळवारी आठ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या चारशेपार म्हणजे 402 झाली आहे. दिवसभरात 320 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याने कोरोना बधितांची एकूण संख्या 14 हजार 252 झाली आहे. तर 302 कोरोनामुक्त झाल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या नऊ हजार 443 झाली आहे. नवी मुंबईचा रिकव्हरी रेट 66 टक्क्यांवर स्थिरावला असला तरी रुग्णांचा मृत्युदर मात्र कमी होत नसल्याने चिंता वाढली आहे. सद्य स्थितीत नवी मुंबईत चार हजार 407 रुग्ण उपचार घेत आहेत. आढळलेल्या रुग्णांची नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 52, नेरुळ 54, वाशी 38, तुर्भे 8, कोपरखैरणे 37, घणसोली 76, ऐरोली 37, दिघा 18 असा समावेश आहे.
रोहा तालुक्यात 18 जणांना लागण
रोहे : प्रतिनिधी
रोहा तालुक्यात मंगळवारी कोरोनाचे 18 रुग्ण आढळल्याने तालुक्यात बाधितांची संख्या 513 वर पोहचली आहे. तर 88 वर्षीय वयोवृध्दाचा मृत्यु झाला आहे. दिवसभरात 14 व्यक्तीनी कोरोनावर मात केल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या 358 झाली आहे, अशी माहिती तहसिलदार कविता जाधव यांनी दिली आहे. मंगळवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये कडसुरे येथे तीन, एक्य सोसायटी वाघेश्वर नगर रोठखुर्द येथे दोन, ग्रीन पार्क हौसींग सोसायटी वरसे येथे दोन, मारुती मंदीराजवळ खारापटी, गोरोबा मंदिराच्या मागे दमखाडी, श्रीरंग अपार्टमेंट समर्थनगर भुवनेश्वर, मनोमनी अपार्टमेंट समर्थनगर भुवनेश्वर, माधव आश्रम छत्रपती शिवाजीनगर, सुविद्या कॉलनी स्वामी समर्थ मंदीर रोड वरसे, सुयश संकुल सेवादल आळी, नागोठणे, वणी, श्रीकृष्णनगर भुवनेश्वर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत 143 रुग्णांवर उपचार चालू आहेत.