Breaking News

मराठा क्रांती मोर्चाची आज रोह्यात धडक

रोहा : रामप्रहर वृत्त

मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक आढावा बैठक शनिवारी (दि. 8) झूममार्फत ऑनलाइन पद्धतीने झाली. रोहा तालुक्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेमागील राजकारण दूर होऊन, योग्य तो तपास पूर्ण करून गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा व्हावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात येईल. त्याचप्रमाणे पीडित बहिणीचे कुटुंब या संकटकाळात एकटे नसून संपूर्ण समाज त्यांच्या पाठीमागे आहे. यासाठी सोमवारी (दि. 10) संपूर्ण राज्यातील समन्वयकांनी पिडीत कुटुंबाला भेट देण्याचे ठरले आहे. त्याचप्रमाणे हे प्रकरण कोणत्याही प्रकारे दडपले जाऊ नये, गुन्हेगारांची नावे तात्काळ जाहीर करावी व अन्य सर्व मागण्यासाठी मराठा समाज आक्रमक होणार आहेत. याच प्रमाणे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित मराठा आरक्षणाचा विषय सरकारने योग्य पद्धतीने हाताळावा अन्यथा याचे गंभीर परिणाम सरकारला सरकारला भोगावे लागतील हा इशारा सरकारला देण्यात आला.  मराठा आरक्षणाच्या लढ्यादरम्यान ज्या आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले होते हे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया तत्काळ करावी, तसेच   येणार्‍या शैक्षणिक वर्षाच्या सर्व प्रवेश प्रक्रियांमध्ये 50 टक्के सवलत देऊन प्रवेश देण्यात यावेत, अशी सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा मराठा समाज पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात येईल असा इशारा सर्वसंमतीने सरकारला देण्यात आला.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply