भाजप उरण महिला मोर्चाने जोपासला रक्षाबंधनातून स्नेहबंध

उरण : वार्ताहर

भारतीय जनता पार्टी उरण महिला मोर्चाच्या वतीने शनिवारी (दि. 8) कोविड योद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी जे लढत आहेत, त्या योद्ध्यांच्या हाताला आणखी बळ याव या उद्देशाने राखी बांधून व कोविड योद्धा प्रमाणपत्र उरण पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले.त्याच प्रमाणे उरण नगरपरिषद येथे वृक्षारोपन करण्यात आले. मोरा सागरी पोलीस ठाण्यात रक्षाबंधन करण्यात आले.

या वेळी उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजप महिला उरण शहर अध्यक्षा संपूर्णा थळी, उरण तालुका महिला अध्यक्षा राणी म्हात्रे, तालुका उपाध्यक्षा निर्मला घरत, उरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वृषाली पवार, महिला पोलीस नाईक सचिता म्हात्रे, भाजप विभाग अध्यक्षा सुगंधा कोळी, सदस्या विश्रांती म्हात्रे, निशा म्हात्रे, कलावती गावंड, रंजना ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे सर्वांनी आपल्या वार्डात विभागात एक झाड लावावे असे हि सांगण्यात आले, असे उरण तालुका महिला अध्यक्षा राणी म्हात्रे यांनी सांगितले. भाजप उरण महिला मोर्चाचे या वेगळ्या उपक्रमाबद्दल कौतुक होत आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदांसाठी भाजप महायुतीकडून पाच जणांचे अर्ज दाखल

युवा नेते परेश ठाकूर, डॉ. अरुणकुमार भगत, गणेश कडू, अ‍ॅड. प्रथमेश सोमण, दिनेश खानावकर यांचा …

Leave a Reply