पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहर भाजप महिला मोर्चाच्या वतीने कोविड योद्धा गौरव सन्मानपत्र रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वावर देऊन कोविड योद्ध्यांना गौरविण्यात आले. पनवेल तालुका व शहर पोलीस ठाणे आणि ग्रामीण रुग्णालय येथील पोलीस, डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका चालक, सफाई कामगार आदींना या वेळी सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजप महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, महिला मोर्चा कामोठे शहर अध्यक्षा वनिता पाटील, पनवेल शहर पदाधिकारी सपना पाटील, नीता माळी, सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार, स्नेहल खरे, रवींद्र नाईक, आदिती मराठे, ज्योती देशमाने, मनीषा चिले, नंदा टापरे, शैला आंबेकर, मयुरी उन्नटकर, अशोक आंबेकर आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कोविड-19च्या काळात स्वतःची पर्वा न करता सेवा करणार्या आणि नागरिकांना मदत करणार्या कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper