Breaking News

रायगडातील सर्व दुकाने दुपारी 2पर्यंतच राहणार सुरू

तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेली सवलत बंद

अलिबाग ः प्रतिनिधी
कोरोनामुळे घालण्यात आलेले निर्बंध रायगड जिल्ह्यात काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. आता सर्व दुकाने सुरू करण्यात परवानगी दिली आहे, परंतु ही दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या कालावधीतच सुरू राहणार आहेत, मात्र त्याच वेळी तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेली विशेष सवलत बंद करण्यात आली आहे.
कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यात काही निर्बंध घालण्यात आले होते. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 11 या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. 1 जूनपासून सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत उघडण्यात परवानगी देण्यात आली आहे.
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक वस्तूंची दुकाने तसेच ताडपात्री, हार्डवेअर, पत्रे, कृषिविषयक वस्तूंची विक्री करणारी दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. ही सूट बंद करण्यात आली आहे. आता ही दुकानेदेखील सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेतच सुरू राहतील.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply