पनवेल : रायगड जिल्ह्यात 12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 10) झाली असून, 385 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 365 रुग्ण बरे झाले आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील पाच, उरण तीन आणि खालापूर, पेण, अलिबाग व रोह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल (महापालिका 169, ग्रामीण 28) तालुक्यात 197, रोहा 52, खालापूर 21, महाड 19, उरण 18, अलिबाग 14, पेण 13, कर्जत पाच, सुधागड चार, माणगाव, म्हसळा व पोलादपूर प्रत्येकी तीन आणि मुरूड, श्रीवर्धन व तळा प्रत्येकी दोन असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 18,922 आणि मृतांची संख्या 516 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 15,046 जणांनी कोरोनावर मात केल्याने 3360 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …
RamPrahar – The Panvel Daily Paper