बेड्ससाठी नवी मुंबई मनपाचा खासगी रुग्णालयांशी करार

पनवेल : बातमीदार

पालिकेच्या पातळीवर बेड्स आणि मनुष्यबळ यातील ताळमेळ आणि रुग्णांची संभाव्य वाढ लक्षात घेऊन नवी मुंबई आणि पनवेल महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. यात नवी मुंबई पालिकेने अतिदक्षता, प्राणवायू पुरविणारी यंत्रणा असलेल्या खाटा आणि कृत्रिम श्वसनयंत्रणा पुरविण्यासाठी खासगी रुग्णालयांशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पनवेल पालिका प्रशासनाने दोन हजार खाटांसाठी (जम्बो फॅसिलिटी) सरकारकडे 50 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

अन्य दोन खासगी रुग्णालयाशी करार करण्याचा निर्णय नवी मुंबई पालिकेने घेतला आहे. सुविधांसोबत त्यासाठी लागणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी मिळत नसल्याने पालिकेच्या पातळीवर ही तयारी करता येत नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. पनवेल पालिका क्षेत्रात आठ हजारांहून अधिक रुग्ण बाधित आहेत. वाढत्या कोरोना चाचणीच्या मोहिमांमुळे भविष्यात ही संख्या 15 हजारांवर जाणार असल्याने पालिकेने दोन हजार खाटांची सोय करण्यासाठी नियोजन केले आहे. यात मोठ्या सुविधांसाठी (जम्बो फॅसिलिटी) अतिदक्षता विभागात 500 खाटा असतील, तर एक हजार खाटांना प्राणवायू पुरवठा करणारी यंत्रणा असेल. उर्वरित 500 खाटा या साधारण विभागातील असतील. या सर्व बाबींसाठी सुमारे 30 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यासाठी दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मोठी उपचार सुविधा उभारण्यासाठी निधीची मागणी केली आहे. मंजुरी मिळाल्यास तातडीने अंमलबजावणी होऊ  शकेल, असे पनवेल पालिका उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.

50 हजार अँटीजन चाचण्यांचा संच

नवी मुंबईसाठी अतिरिक्त 50 हजार अँटीजन (प्रतिजन)चाचण्या संच मिळाले आहेत. दिवसाला सरासरी 2500 प्रतिजन चाचण्या  केल्या जात आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी झाली आहे. शहरातील 25 केंद्रांवर प्रतिजन चाचण्या सुरू आहेत. 34 वाहनांद्वारे विविध ठिकाणी चाचण्यांना सुरुवात झाली आहे. सुरुवातीला 40 हजार प्रतिजन चाचण्यांद्वारे नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. आता 50 हजार चाचण्यांचा संच मिळाला आहे.

75 अतिदक्षता खाटांची लवकरच सोय

सध्या नवी मुंबईत अडीच हजारांहून अधिक प्राणवायू पुरविणारी यंत्रणा असलेल्या खाटा आहेत. मात्र, कृत्रिम श्वसन यंत्रणा आणि अतिदक्षता विभागातील खाटांची मोठी कमतरता जाणवत आहे. त्यामुळे वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयातील कोविड रुगणालयानंतर  पालिकेने सिडको प्रदर्शनी केंद्रात 75 अतिदक्षता खाटांची सोय करण्यात येणार आहे.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply