पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 13) तब्बल 29 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, 440 नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे 500 रुग्ण दिवसभरात बरे झाले. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 11, उरण व खालापूर प्रत्येकी चार, पेण तीन, मुरूड व अलिबाग प्रत्येकी दोन, रोहा, श्रीवर्धन व महाड प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल तालुक्यात 211, पेण 50, उरण 36, महाड 33, अलिबाग 30, रोहा 25, खालापूर 19, कर्जत व मुरूड प्रत्येकी 10, श्रीवर्धन आठ, सुधागड पाच, पोलादपूर दोन आणि म्हसळा एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 20,146 आणि मृतांची संख्या 571 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 16,180 जणांनी कोरोनावर मात केल्याने 3395 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इन्व्हेस्टिचर सेरेमनी
उलवे नोड ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …
RamPrahar – The Panvel Daily Paper